खानापूर : चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील रहिवासी राजाराम लक्ष्मण पाटील (वय 86) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. हलशी येथील सरकारी मराठी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. तसेच त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील व आनंदगड हायस्कूलचे क्रीडा शिक्षक फोंडूराव पाटील व गणेबैल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक किरण पाटील यांचे ते वडील होत. अंत्यसंस्कार आज रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
समांतर क्रांती परिवारातर्फे मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली
म्हादई: २३ रोजी ‘सर्वोच्च’ सुणावणी; एच.के.पाटील काय म्हणाले?
समांतर क्रांती/पणजी गोव्याने कर्नाटक विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेसह म्हादईसंदर्भातील इतर सर्व याचिकांवर गुरूवारी (ता.२३) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, कर्नाटकाचे कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी केंद्राची भूमिका संशयास्पद असून भाजप म्हादईप्रश्नाचे राजकारण करीत असल्याची टीका केली आहे. म्हादई लवादाच्या निवाड्यानंतरही कर्नाटकाने म्हादई प्रश्नी न्यायालयाची दिशाभूल चालविली होती. त्यामुळे गोवा सरकारने कर्नाटक विरोधात […]