खानापूर: जनसामान्यांचा क्रांतीकारी आवाज बनलेले साप्ताहिक ‘समांतर क्रांती’ आणि वेबपोर्टल पुन्हा आपल्या सेवेत दाखल होत आहे. १९ जून २०१७ रोजी साप्ताहिकासह वेबपोर्टल, युट्यूब चॅनेल आणि प्रकाशनासह जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेल्या ‘समांतर क्रांती’ला कोरोना काळात शिथीलता आली. ती सर्वच क्षेत्रात होती. पण, पुन्हा एकदा मरगळ झटकून समांतर क्रांती वेबपोर्टल आज बुधवारी (दि.२६) प्रचंड लोकाग्रहास्तव वेबपोर्टल पुन्हा त्याच दिमाखात, नव्या उत्साहात सुरू होत आहे.
सर्वसामान्यांच्या समस्यांना अंगार फुलविण्यासह बहुजन हिताय हे ध्येय बाळगून समांतर क्रांतीची स्थापना करण्यात आली. आवघ्या कांही दिवसात हे माध्यम सर्वसामान्यांचा क्रांतीकारी आवाज तर बनलेच; शिवाय दुर्जनांचा ‘कर्दनकाळ’ बनल्याच्या सुखद प्रतिक्रीया आजही व्यक्त होत असून त्याला साजेशे उपक्रम घेऊन आम्ही आपल्या सेवेत दाखल होत आहोत. खानापूर तालुक्यातील सुज्ञ वाचकांसह आमचे नेहमीचे हितचिंतक, जाहिरातदार आणि सहकारी उस्त्फूर्द स्वागत करतील, याबाबत अजिबात शंका नाही. धन्यवाद!
- संपादक
खानापूर ता.पं.समोर सोमवारी ‘वनवासीं’चा ठिय्या
खानापूर: वनवासींच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.३१) येथील तालुका पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. पिडीतांनी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीने केले आहे. गेल्या वर्षभरापासून समितीच्या माध्यमातून जंगलात राहणाऱ्या गवळी-धनगर, सिध्दी आणि कुणबी मराठा समुदायाला अतिक्रमीत जमिन कायम मालकी हक्काने मिळावी, वनहक्क कायद्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी, त्यांना वीज, पाणी व […]