
समांतर क्रांती / खानापूर
हल्ली मुलांचे वाढदिवस हटके स्टाईलने साजरे करण्याच्या नादात त्याचे उत्सवीकरण झाले आहे. चंगळ आणि पैशांची फुकटची उधळण ही ‘इमेज स्टेटस’ बनली असतांना मणतुर्गा येथील पुरोगामी विचारांचे पाईक आणि काँग्रेसचे नेते ईश्वर बोबाटे यांनी त्यांचा चिरंजीव सार्थकचा वाढदिवस पारंपारिक पध्दतीने साजरा केला.
केक कापणे एकवेळ ठिक आहे, पण मुलाला केकचा घास भरविण्यापूर्वी तो त्याच्या तोंडाला फासण्यात धन्यता मानणारी पिढी सैर झाली असतांना केकला फाटा देत सार्थकचा वाढदिवस साजरा झाला. मेनबत्ती विझविण्याऐवजी निरांजन ओवाळून आणि गोड लाडूचा घास भरवून सार्थकचे अभिष्टचिंतन करण्यात आले. विशेष म्हणजे हा वाढढदिवस निसर्गरम्य अशा शिवारात करून ‘आम्ही शेतकऱ्यांची पोरं हाय रे’ हा संदेशच जणू ईश्वर बोबाटे यांनी यामाध्यमातून दिला आहे.
या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला श्री. बोबाटे यांचे स्नेही आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन बोबाटे परिवाराने केले होते. यावेळी उपस्थितांनी वाढदिवस असा साजरा व्हायला हवा, अशी आपेक्षा व्यक्त करतांनाच बोबाटे यांचे या नियोजनाबद्दल अभिनंदनही केले.
कु. सार्थक यास समांतर क्रांती परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..
खानापूर : महिनाभरात काय घडलं, काय बिघडलं?
समांतर क्रांती / विशेष (उत्तरार्ध) महिनाभरात अनेक चांगल्या घटना तालुक्यात घडल्या. यात्रा-जत्रांसह शैक्षणिक आणि सामाजिक-सास्कृतिक कार्यक्रमांचा धुरळा उडत असतांनाच अनेक वेदनादायी घटनादेखील या महिन्यात घडल्या. सीमालढ्याच्या दृष्टीने एकीकडे कांही चांगल्या बाबी घडल्या तर माजी आमदार कै. व्ही.वाय.चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा चव्हाण यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. तसेच नंदगड येथील सीमासत्याग्रही पुंडलीकराव चव्हाण यांचे […]