वैशाली पाटील यांचे प्रतिपादन; नंदगड जेसीएस शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
खानापूर: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नेहमीच स्त्रियांची स्थिती बदलायची होती. त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका बनल्या. बालविवाहामुळे लहान वयातच मुली विधवा होत. बाल विधवांना मुंडन केले जात असे. लैंगिक शोषणही होत असे. सावित्रीबाईंनी त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. रुढी-परंपराना विरोध करून अथक परिश्रम घेत तत्कालीन सनातनी समाज व्यवस्थेवर प्रहार केला, असे मत मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी व्यक्त केले.
नंदगड जेसीएस शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठी मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मिना उत्तूरकर होत्या. प्रारंभी क्रांतीसूर्य जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना मुख्याध्यापिका मिना उत्तूरकर म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाला महत्व देत फुलेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. एका व्यवस्थेने मुलींना नाकारलेल्या शिक्षणाचे दरवाजे फुले दांपत्याने खुले केल्यामुळेच आज स्त्री सबला बनली. ती विविध क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांधा लावून ठामपणे उभी राहिली आहे, याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना द्यावे लागेल, असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलतांना छाया मिटकर म्हणाल्या, त्या काळात अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दुष्कृत्यांमुळे अनेक स्त्रियांना आपला जीव द्यावा लागला होता. आपल्या लोकांना पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सावित्रीबाईंनी महिलांसाठी स्वतंत्र विहीरही खोदली. सावित्रीबाई फुले मुलींवरील भेदभावाच्या विरोधात लढा उभारला, त्यांची जाणिव ठेवून आज महिलांनी सोवळ्या-ओवळ्यात अडकून न पडता, स्वतंत्र विचारसरणीचा अवलंब केला पाहिजे.
प्रसंगी शिक्षिका सविता देसाई, कल्पना बाबलीचे, निलांबिका वस्त्रद, मेघा पाटील, मंजुळा देमट्टी,प्रियंका चन्नेवाडकर,मोहन पाटील आदींसह शाळा सुधारणा समिती अध्यक्षा स्मिता पाटील व प्रणाली तोरगल सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.
लोखंडी रॉड पडून जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू
खानापूरात गुरूवारी घडली होती घटना समांतर क्रांती / खानापूर Worker injured by falling iron rod dies येथील बहार गल्लीत घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असतांना डोकीत लोखंडी रॉड पडल्याने जखमी झालेल्या कामगाराचा आज शुक्रवारी (ता.०३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाना चापगावकर (वय ५४, रा. केंचापूर गल्ली-खानापूर) असे मयताचे नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी […]