समांतर क्रांती विशेष
scam-2003-a-telgi-story: देशाची अर्थव्यवस्था हादरवून सोडलेल्या बनावट स्टँप घोटाळ्यावर अधारित ‘स्कॅम २००३- अ तेलगी स्टोरी’ ही वेबसेरीज २ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. तशी घोषणा सोनी लिव्हच्या सोशल मिडिया अकाउंटवर ही घोषणा केली आहे. रंगभूमीवरील अभिनेता गगन देव हा या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे अन् याचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. हंसल मेहता यांची ‘स्कॅम १९९२- अ हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसिरीज प्रचंड गाजली होती. त्या यशानंतर तेलगीच्या जीवनपटावर अधारित ‘स्कॅम २००३ – अ तेलगी स्टोरी’ प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
मध्यंतरी या स्टोरीवर तेलगीच्या कुटुंबीयांनी आक्षेप नोंदवित निर्मात्यावर केस दाखल केली होती. त्यामुळे ही सिरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. पण, आता त्या स्टोरीमध्ये कांही बदल करून ही सिरिज प्रदर्शित केली जाणार असल्याचे हंसल मेहता यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार संजय सिंग यांच्या रिपोर्टर की डायरी या पुस्तकावर ही स्टोरी बेतली आहे.
कोण होता तेलगी..?
तेलगी खानापूर ही खानापूरची ओळख बनली. एकेकाळी खानापुरातील विद्यानगर परिसरात राहणारा करीम तेलगी याने देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून सोडले. तब्बल ३० हजार कोटींचा बनावट स्टँप घोटाळ्याचा तो म्होरक्या होता. येथील रेल्वे स्थानकावर फणसाचे गरे विकणारा पोऱ्या ते कोट्यवधींच्या स्टँप घोटाळ्याचा मास्टरमाईंड ही त्याची वाटचाल विलक्षण रहस्यमय होती. त्याला ३० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. त्यापैकी १३ वर्षे तो कारागृहात होता. २३ आक्टोबर २०१७ रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी बंगळूर येथील व्हिक्टोरीया इस्पितळात त्याने अखेरचा श्वास घेतला तरी त्याच्याबद्दलच्या दंतकथा, अख्यायिका आजही खानापूरात चर्चिल्या जातात.
- चित्रपट आणि वेबसिरीज
- यापूर्वीही तेलगी याच्या जीवनपटावर अधारित मुद्रांक या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. २००९ मध्ये शाकीर शहा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला पण तो वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने रिलीज झाला नाही.
- उल्लू या सोशल मिडियाने २०२० साली ‘पेपर’ ही वेबसिरिज प्रदर्शित केली होती, ज्यामध्ये रोहीत रॉयने तेलगीची भूमिका केली होती.
- देशभरातील आठ गाजलेल्या घोटाळ्यांवर आधारित मनी माफीया वेबसेरिजमध्येही पहिली मालिका तेलगीच्या स्टँप घोटाळ्यावर आधारित होती.
- आता ‘स्कॅम २००३- अ तेलगी स्टोरी’ ही वेबसिरीज सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
खानापूर: ग्रा.पं. अध्यक्ष आरक्षण जाहीर
खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष आरक्षण जाहीर झाले असून ते खालीलप्रमाणे आहे.सामान्य: नंदगड, हलशी, मणतूर्गा, पारवाड, बैलूर, गोल्याळी, लोंढा, बिडी, निलावडे, गंदीगवाड, पारीश्वाड, इटगी, हिरेहट्टीहोळी, कोडचवाड, केरवाडसामान्य महिला: बरगाव, शिंदोळी, कापोली, शिरोली, नागरगळी, निट्टूर, इदलहोंड, कणकुंबी, नागुर्डा, हलकर्णी, घोटगाळी, हिरेमूनवल्ली, क.बागेवाडी, भुरूणकीअ वर्ग: चापगाव,हेब्बाळ, तोपीनकट्टी, करंबळ, गुंजी, लिंगणमठअ वर्ग महिला: क.नंदगड, आमटे, नंजनकोडल, मोहिशेत, माचीगड, […]