समांतर क्रांती / खानापूर
शाळा सुटल्यानंतर कुणी नोकरीत, कुणी व्यवसायात तर कुणी शेतीत गुंतलेले. संसाराच्या धबागड्यात भूतकाळ्याच्या आठवणी उराशी घेऊन जगणारे मित्र एकत्र येणार आहेत. त्यांची शाळा तब्बल ३५ वर्षांनंतर भरणार आहे. निमित्त आहे स्नेहमेळाव्याचे..
तालुक्यातील गुंजी येथील सरकारी शाळेतील १९८५-८६ आणि मराठा मंडळ संचलित गुंजी हायस्कूलचे १९८८-८९ च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी पुन्हा एकदा एकमेकांची गळाभेट घेणार आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी उद्या रविवारी (ता.०५) स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या स्नेहमेळाव्यात त्यांचे गुरूजनही सहभागी होणार आहेत. त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुकर करणाऱ्या या शिक्षकांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे.
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांची सुख-दु:ख वाटून घेतानाच ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. ३५ वर्षांपूर्वी शिकलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उद्या रविवारी जांबोटी भागात वीज खंडित
समांतर क्रांती / जांबोटी दुरुस्तीच्या तातडीच्या कामासाठी उद्या रविवारी (ता. 5) जांबोटी भागात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. उचवडे, बैलूर, मोरब, जांबोटी, चिखले, पारवाड, कुसमळी, चिगूळे या गावात सकाळी 10 ते सायंकाळी 6पर्यंत वीज खंडित केली जाणार आहे.