खानापूर:कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर घटक पदाधिकारी व जेष्ठ नागरिकांची बैठक उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मिटींगचे विषय
विश्व योगा दिन साजरा करणेबाबत योगाचे योग गुरु श्रीयुत अरविंद कुलकर्णी खानापूर यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे.
पुढील सहामाही कार्यक्रमाचे नियोजन करणे.
लोंढा वनविभागात बिबट्याकडून हल्ल्याचा प्रयत्न
समांतर क्रांती वृत्त लोंढा: वन परिक्षेत्रातील राजवाळ-गवळीवाड्याच्या परिसरात गेल्या कांही दिवसांपासून एका बिबट्याने ठाण मांडले आहे. कांही नागरीकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केल्याने परीसरात भितीचे वातावरण आहे. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. गावापासून जवळच झाडीत हा बिबट्या वावरत असून तो राजरोसपणे संचार करीत आहे. लोकांची चाहूल लागल्यानंतर तो प्रचंड ओरडत आहे. तसेच हल्ल्याचा […]