समांतर क्रांती वृत्त
महिलांची ‘कामइच्छा’ पूर्ण करा आणि कमवा हजारो रूपये, असा कॉल तुम्हालाही आलाय का? एकाकी महिला आणि तरूणींसोबत सेक्स करण्याचे हजारो रुपये मिळतील, असे कॉल सध्या अनेकांच्या मोबाईलवर येत असल्याने अनेकजन हैराण तर कांहीजन खूष झाले आहेत. प्रत्यक्षात हा ‘मामला’ काय आहे?
आमच्या एका वाचकाला एक कॉल आला, त्यात समोरून बोलणारी व्यक्ती ‘स्वत: इंडियन एस्कॉर्ट कंपनीमधून बोलत असल्याचे सांगते. ज्या महिला किंवा तरूणींचे नवरे नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात, ज्या नवतरूणींना सेक्सबाबत माहिती हवी असते. त्यांच्याशी शय्यासोबत करण्यासाठी तुम्हाला प्लेबॉय म्हणून काम करावे लागेल. त्यासाठी सदर कंपनी तुमच्या शहरातील हॉटेल, लॉज बूक करून देईल. सदर महिलेशी शय्यासोबत केल्यानंतर ती तुम्हाला दहा हजार देईल, त्यातील अर्धे तुमचे, अर्धे आमचे. कंपनीकडून नोंदणीसाठी सहाशे रुपये शुल्क आकारले जाते. ते भरल्यानंतर ओळखपत्रही दिले जाते. शिवाय लॉजदेखील कंपनीच बूक करून देते. तेथे तुम्ही जा आणि तुमचे ‘काम’ करून पैसे घेऊन निमूटपणे निघून जा.’ असे या कॉलमध्ये म्हटले आहे.
सदर कंपनी मोठ्या शहरांसह खानापूरसारख्या लहान शहरातही कार्यरत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितल्यामुळे आमच्या वाचकाने त्याबाबत ‘समांतर क्रांती’ला माहिती दिली. ज्या अर्थी पुरुषांना अशी ऑफर असेल तर परिसरातीलच महिला त्यांच्या गळाला लागल्या असतील, असा संशय त्यांना आहे. यात फसवणूकही होऊ शकते. बलात्कार केल्याचे गुन्हे दाखल करून मोठी रक्कम वसुल करण्याचे कारस्थानही यामागे आहे. त्याशिवाय खेड्या-पाड्यातील तरूणींना आणि महिलांना यात गोवले जात असल्याचा संशय असून यावर कारवाई व्हावी, असे वाचक कळवितात. खानापूर शहरात गेल्या कांही दिवसात असे प्रकार घडले असून बदनामीच्या भितीने त्याची वाच्यता झाली नसल्याचे समजते. त्यामुळे तुम्हाला जर असा कॉल आला तर सावधान!
I came across this article and discovered it to be an excellent source. Thank you for sharing!
I enjoyed reading this post. It’s concise yet packed with useful information. Thanks!
I really enjoyed reading this blog. It’s brief, yet loaded with important details. Thanks!