बेळगाव: जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या मुलाने लग्न झाल्याच्या अवघ्या महिनाभरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29), आर्किटेक्चर मूळ रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर बेळगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, महिन्याभरापूर्वीच प्रतिकचा विवाह झाला होता. घरातील सर्व मंडळी खोलीत असताना, अचानक त्याने दुसऱ्या खोलीत गळफास लावून स्वतःचे जीवन संपविले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांचे ते चिरंजीव होत. घटनेची नोंद कॅम्प पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने शिरोळकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
One thought on “बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुखांच्या मुलाची आत्महत्या”