खानापूर : सीमा भागातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत मंगळवारी (ता. १४ ) खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी साडे दहा वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा खानापूर तालुक्यासह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
शिवाजी विद्यापीठतर्फे सिमाभागातील विद्यार्थांसाठी राबविण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेंतर्गत मराठी भाषिक विद्यार्थांंना विज्ञान, वाणिज्य व कला क्षेत्रातील पदव्युत्तर शैक्षणिक अधि विभागातील प्रत्येक शाखेत 10 टक्के आरक्षण देवून प्रवेश शुल्कात पूर्ण सवलत देण्यात आली आहे.बहुतेक विद्यार्थांचा अभियांत्रिकी शाखांकडे कल असतो. पण आजच्या घडीला वाढती महागाई, ओढवलेली बेरोजगारी यामुळे कोलमंडलेला घरखर्च, ज्यामुळे इच्छा असूनही खर्चिक शिक्षणामुळे पालकांची अपरिहार्यता विचारात घेवून निवडलेला पर्यायी शैक्षणिक मार्ग अन् त्यात भाषिक सक्ती या सर्व बाबी विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठाची सीमाभागासाठी नेमलेल्या स्वतंत्र व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन तांत्रिक विभागातील अभियांत्रिकीच्या अधिविभागांत 25 टक्के प्रवेश शुल्कात सवलत दिली आहे. तसेच सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व सवलतीत प्रवेश योजना जाहीर केली आहे. यामधील अनुदानित अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ आहे, तर विना अनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५ टक्के शुल्क सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वस्तीगृहासाठीची पूर्णत: शुल्क माफ करण्यात आले आहे, याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत, तरी खानापूरसह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि शिवस्मारक येथे वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन खानापूर तालुका म. ए.समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
आरोग्य क्षेत्रात पारिचारीकांचे कार्य मोलाचे: डॉ. सोनाली सरनोबत
बेळगाव: आरोग्य क्षेत्रात पारिचारीकांची प्रमुख भूमिका असते. त्यांचे कार्य मोलाचे असते. त्यामुळेच या क्षेत्रातील कामकाज सोयीचे होते, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. त्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये आंतराष्ट्रीय नर्स (पारिचारीका) दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर मिनाक्षीताई रावसाहेब पाटील, डॉ. महादेव दिक्षीत आणि डॉ. माधुरी दिक्षीत उपस्थित होत्या. प्रसंगी आंतरराष्ट्रीय […]