
बेळगाव : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची खानापूर म.ए.समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी गोवा येथे भेट घेतली.
यावेळी दळवी यांनी, फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधानांना माहिती द्यावी आणि सीमाप्रश्न लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
तसेच संमेलनाला खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यावेळी उमेश पाटील, किरणं हुद्दार, शेखर तळवार आदी उपस्थित होते.

एक गेला, तीन आले.. आता वनखाते कुठे गेले?
समांतर क्रांती / खानापूर तीन महिन्यांपासून जळगे गावाच्या परिसरात ठाण मांडून लाखो रुपयांचे नुकसान केलेल्या टस्कराला जेरबंद करून त्याची शिमोगा जिल्ह्यातील सक्रेबैल हत्तींच्या शिबीरात रवानगी करण्यात आली. पण, एवढ्याने तालुक्यातील हत्ती समस्या सुटलेली नाही. अद्यापही गुंजी, नंदगड वनविभागात दोन कळपांनी उच्छांद मांडला आहे. खानापूर शहरापासून आवघ्या तीन कि.मी. अंतरावरील कौंदल येथे हत्तींच्या कळपाने सोमवारी (ता.१३) […]