गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीय राजधानीत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मध्यरात्रीनंतर लगेचच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकार स्थापनेसाठी एकमत झाले असल्याचे स्पष्ट केले. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचे मुख्य शिल्पकार आहेत. 20 मे रोजी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठकही बोलावण्यात आली आहे, ज्यात 75 वर्षीय कुरुब नेते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. जनता परिवारातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे तळागाळातील नेते सिद्धरामय्या यांनी 2006 मध्ये एचडी देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देवराज उर्स यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. वकील ते राजकारणी बनलेले सिध्दरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. कारण काँग्रेसच्या तीन निरीक्षकांनी पक्षाच्या हायकमांडला पाठवलेल्या अहवालानुसार त्याना 85 आमदारांचा पाठिंबा आहे.
मस्तवाल नेते, लाचार पुढारी
चेतन लक्केबैलकर सीमाप्रश्न ही केवळ भाषेसाठीची लढाई नाही, धगधगणाऱ्या अग्नीकुंडातील तो अस्मितेचा वनवा आहे. निवडणुकीत हरल्याने हा वनवा विझेल, असा अंदाज बांधून बेताल वक्तव्य करणे हा हलकटपणा आहे. बेळगावच्या तीन जागांसह खानापूर आणि यमकनमर्डीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवाला सर्वसामान्य मराठी भाषिकांना जबाबदार धरले जात आहे. त्यात चुक कांहीच नाही. तरीही नेत्यांचा मस्तवालपणा आणि गावगन्ना पुढाऱ्यांची […]