विशेष म्हणजे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री म्हणून बी.एस.येडीयुराप्पा यांनी नोंद केली. त्यांना दोन वेळा अनुक्रमे सात आणि सहा दिवसांचे मुख्यमंत्री म्हणून समाधान मानावे लागले होते.
स्वातंत्र्यानंतर कर्नाटकात १५ विधानसभा अस्तित्वात आल्या. आताची १६ वी विधानसभा असून यावेळी मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या हे दुसऱ्यांदा शपथबध्द होत आहेत. यापूर्वी १३ मे २०१३ रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्यांनी लोकाभिमूख योजनांचा धडाका लावल्याने तब्बल ३५ वर्षानंतर पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी नोंदविला.
आतापर्यंत ३१ मुख्यमंत्र्यांनी राज्याचे सत्ताकेंद्र सांभाळले असून त्यामध्ये निजलिंगप्पा, देवराज अरसू, रामकृष्ण हेगडे, विरेंद्र पाटील, एच.डी.कुमारस्वामी यांनी प्रत्येकी दोनवेळा मुख्यमंत्रीपद भुषविले. तर बी.एस.येडीयुराप्पा हे सर्वाधिक चारवेळा मुख्यमंत्री झाले. पहिल्यावेळी केवळ सात दिवस, दुसऱ्यावेळी ३ वर्षे ६७ दिवस, तिसऱ्यावेळी सहा दिवस तर चौथ्यांदा २ वर्षे दोन दिवस असा त्यांचा कार्यकाळ राहिला.
आतापर्यंत एस.आर.बोम्मई व बसवराज बोम्मई, एच.डी.देवेगौडा व एच.डी.कुमारस्वामी या बापलेकांनी मुख्यमंत्रीपद भुषविले आहे.
विशेष म्हणजे लोकाभिमूख कामांमुळे जनतेच्या स्मरणात राहिलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये प्रामुख्याने एस. नजलिंगप्पा, देवराज अरसू, आर.गुंडूराव, बंगारप्पा, विराप्पा मोईली, बी.एस.येडीयुराप्पा आणि सिध्दरामय्या यांचा समावेश आहे. त्यांनी आधुनिक विकास साधतांनाच कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले.
हब्बनहट्टीत अस्वलांचा महिलेवर हल्ला
जांबोटी: शेतात काम करीत असताना दोन अस्वलांनी महिलेवर हल्ला केल्याची घटना आज शनिवारी सकाळी हब्बनहट्टी येथे घडली. रेणुका इराप्पा नाईक (वय 60) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर बेळगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. सादर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.