खानापूर: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांनी शुक्रवारी (ता.१२) उमेदवारी अर्ज दाखल केला. म.ए.समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई हे सोमवारी (ता.१५) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर मंगळवारी (ता.१६) काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
तिन्ही उमेदवारांनी प्रचाराला धडाक्यात सुरूवात केली असून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणखी रंगत येणार आहे. काँग्रेसने यावेळी सत्ताधारी भाजपला मात देण्याचा चंग बांधत प्रचाराची मोहीम उघडली आहे. खा.अनंतकुमार हेगडे यांच्या ३० वर्षांच्या अपयशी कारकिर्दीमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिवाय कित्तूर, हल्याळ, कारवार, भटकळ, शिरसी या विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्याचाही फायदा काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना होणार आहे.
कर्नाटकात काँग्रेसने वर्षभरात जो बदल घडवून आणला तो जनतेच्या नजरेसमोर आहे. काँग्रेसने भौतिक विकासावर भर दिला आहे. त्याउलट भाजप केवळ खोटारडेपणा करून लोकांची फसवणूक करीत आहे. जात-धर्माचे राजकारण करून देशातील वातावरण बिघडवले जात आहे. तळगाळातील माणसाला कांही किमत राहिलेली नाही. त्यामुळे जनतेला बदल हवा आहे. साहजिकच जनता यावेळी उस्त्फुर्दपणे काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीच्या पाठीशी उभी आहे.
– डॉ. अंजली निंबाळकर, उमेदवार काँग्रेस
म.ए.समितीने पहिल्यांदाच लोकसभेसाठी उमेदवार दिला आहे. निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांनीही प्रचाराला सुरूवात केली आहे. सद्या ते तालुक्यातील जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांना समृध्द राजकीय वारसा लाभला आहे. अलिकडच्या काळात समितीचा प्रभाव कमी झाल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत सरदेसाई कितपत झेप घेतात? याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मराठी भाषिकांची फसवणूक केली आहे. मराठीवर होणारा अन्याय वाढतच आहे. अशा काळात मराठीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी मराठी भाषिकांवर आहे. याच मुद्यावर ही लोकसभेचे निवडणूक लढवित आहोत. त्यामुळे संपूर्ण मतदार संघातील मराठी भाषिक आणि दोन्ही राष्ट्रीय पक्षांना कंटाळलेली जनता समिती उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी असेल.
– निरंजन सरदेसाई, उमेदवार म.ए.समिती
यशवंत बिर्जेंसह अनेकांचा म.ए.समितीला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’
पत्रकार परिषदेत दिली माहिती; लवकरच काँग्रेसवासी होणार खानापूर: म.ए.समितीचे माजी आमदार एल.बी.बिर्जे गुरूजी यांचे चिरंजीव आणि म.ए.समितीचे माजी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी काँग्रेस प्रवेशाचे सुतोवाच्च केले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी समितीला सोडचिट्टी देत असल्याचे स्पष्ट केले असून त्यांच्यासमवेत समिती आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. Yashwant Birje and many others says last ‘Jai Maharashtra’ to […]