जोयडा: आगामी विधानसभा निवडणुक कोणत्या पक्षातून लढविणार, यासंदर्भात माजी विधान परिषद सदस्य एस एल घोटणेकर यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रामनगर येथे केली. त्यात निवडणूक लढविण्यास आपण सज्ज असून या महिन्यात योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगत एस एल घोटणेकर कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
एस एल घोटणेकर यांनी रामनगर येथील समुदाय भावनात आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुक लढवण्यासंदर्भात चर्चा केली. या बैठकीत माजी तालुका पंचायत सदस्य शरद गुर्जर, जगलबेट ग्राम पंचायत अध्यक्ष गिरीश नाईक, घोटणेकर यांचे पुत्र श्रीनिवास घोटणेकर, रामनगर भागातील 100 पेक्षा अधिक कार्यकर्ते, व्यवसायिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना कार्यकर्त्यांनी एस एल घोटणेकर यांनी निवडणूक लढवणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज आहेत, त्यामुळे तुम्ही निवडणुकसंदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन कार्यकर्त्यांचा गैरसमज दूर करावा, असे सांगितले.
रामनगर: माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांवर पालकांनीच केली कारवाई
जोयडा: रामनगर हनुमान गल्ली येथील प्राथमिक हिरीय सरकारी शाळेत माध्यन आहार बनविणाऱ्या महिला बेजबाबदारपणे काम करीत होत्या, त्यांच्यामध्ये वारंवार होणारे वाद यामुळे मुलांना योग्य दर्जाचे अन्न मिळत नव्हते, मुलांसाठी असलेल्या अन्न धान्याचा दुरपयोग होत होता, त्यामुळे शाळेत जेवण बनविणाऱ्या तिन्ही महिलांना कामावरून काढले आहे, यामध्ये कोणालाही जातीवरून त्रास दिला नाही, अशी माहिती शाळा विकास आणि […]