
समांतर क्रांती / विशेष
महाराष्ट्र राज्याला हादरा दिलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. आतापर्यंत किती मंत्र्यांनी आणिबाणीच्या काळात राजिनामे दिले. विशेषत: खानापूरशी संबंधीत तेलगी घोटाळ्यात (बनावट स्टँप) कुणाला राजिनामा द्यावा लागला होता? उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होणारा हा नेता कोण होता?
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर सरकारवर दबाव वाढल्याने अखेर दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी राजिनामा दिला. मुंडे हे राजिनामा देणारे पहिलेच मंत्री नाहीत, ज्यांनी राजिनामा दिला. यापूर्वीही अनेक मंत्र्यांनी त्यांच्या काळात राजिनामे दिले आहेत.

बॅ. ए.आर.अंतुले यांनी सिमेंट घोटाळ्यात, शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी स्वत:च्या मुलीचे गुण वाढविण्यासाठी दबाव टाकल्याबद्दल तर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. तसेच हवाई सुंदरीशी गैरवर्तन केल्याचे उघड झाल्यानंतर रामराव आदिक, सिंचन घोटाळ्यात अजित पवार, २६/११ च्या हल्ल्यातील व्यक्तव्यानंतर आर.आर.पाटील तर तेलगी घोटाळ्यावरून छगण भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता.
याशिवाय अनिल देशमुख, संजय राठोड, एकनाथ खडसे, नवाब मलिक, सुरेश जैन सुरुपसिंह नाईक, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, बबन घोलप यांनाही अशाच प्रकारे मंत्रीपदाचा त्याग करीत राजिनामा द्यावा लागला होता.
आता धनंजय मुंडे यांना देशमुख यांच्या हत्याकांडामुळे मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले असून तेलगी घोटाळ्यात पायउतार झालेले छगण भुजबळ यांची त्यांच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

अमृत महोत्सवाचे आयोजन ही उतराई: विठ्ठल हलगेकर
कालमणी शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात समांतर क्रांती / जांबोटी शिक्षण माणसाला शहाणपण देते. गेल्या ७५ वर्षांपासून कालमणीची मराठी शाळा या परिसरातील लोकांना शहाण करीत आली आहे. त्यामुळे या शाळेचा अमृत महोत्सव साजरा होणे ही या शाळेच्या ॠणातून उतराईच आहे, असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. नुकताच कालमणी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला ७५ वर्षे […]