समांतर क्रांती वृत्त
खानापूर: ट्रकमध्ये कप्पे करून त्यातून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा २५ लाखांचा ट्रक आणि २७ लाखांच्या दारूसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कणकुंबीजवळ करण्यात आली. विशेष म्हणजे ट्रकमधील कप्पे तोडण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर करावा लागला. चोर कितीही शिरजोर असला तरी तो कधी ना कधी सापडतोच. या आश्चर्यजनक घटनेची तालुकाभर चर्चा आहे.
गोव्याहून परतणाऱ्या ट्रकमध्ये लाखोंची दारू असल्याची माहिती अबकारी आयुक्तांना मिळाली. त्यावरून कणकुंबीजवळच्या नाक्यावर एका ट्रकची झाडाझडती घेतली असता. या ट्रकमध्ये तब्बल २७ लाख ५२ हजार ३९८ रुपयांची गोवा बनावटीची दारू आढळून आली. पण, ट्रकमध्ये असे कांही चोरकप्पे तयार करण्यात आले होते, की ते खुले करणे शक्य नव्हते. शेवटी ट्रक खानापूरला आणून जेसीबीच्या सहाय्याने कप्पे मोकळे करून त्यातील दारू बाहेर काढण्यात आली. चालक प्रदीपकुमार आणि क्लिनर रामचंद्र पाशापूर्वी (दोघेही रा. उत्तरप्रदेश) यांनी भयंकर शक्कल लढवली होती. पण, अबकारी आयुक्त वाय.मंजुनाथ आणि सहायक आयुक्त फिरोजखान किल्लेदार यांनीही तितक्याच शिताफीने ही चोरी पकडली.
अबकारी खात्याने २७ लाखांच्या दारूसह २५ लाखांचा ट्रक जप्त केला आहे. तसेच चालक आणि क्लिनरला अटक केली आहे. खानापूर अबकारी विभाग अधिक तपास करीत असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
‘मध्यवर्ती’कडे यादी: जुने गडी अन् खेळही जुनाच!
समांतर क्रांती वृत्त खानापूर: नुकताच खानापूर म.ए.समितीने कार्यकारीणीची यादी मध्यवर्ती म.ए.समितीकडे सुपूर्द केली आहे. यादीतील नावे पाहता जुने गडी अन् खेळही जुनाच अशी स्थिती आहे. त्यामुळे समितीच्या संघटन कार्याला उर्जितावस्था मिळण्याची शक्यता धूसरच आहे. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर समितीच्या जेष्ठ नेत्यांना शहाणपण येईल, अशी जी मराठी भाषीकांची आशा होती, ती मावळली आहे. नव्या चेहऱ्यांना […]