समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील ग्राम पंचायतपासून ते तहसीपर्यंत सगळ्याच शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे. जाणसामान्यांचे एकही काम आर्थिक गैरव्यवहाराशिवाय होत नाही. त्यामुळे जनता मेटकुटीस आली आहे. तालुक्यातील भ्रष्टाचारविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. जनतेची पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
खानापूर शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात सावळागोंधळ आहे. सरकारी कामासाठी पैश्याचे वजन ठेवल्याशिवाय काम होत नाहीत. यात तहसील कार्यालय, शिक्षण, पोलिस, वन खात्यासह शासकीय रुग्णालय आघाडीवर आहे. गैरव्यवहाराशिवाय येथील पानही हलत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते चपराश्यापर्यंत सगळ्यांचेच हात ओले करावे लागतात. त्यामुळे सर्वासामान्यांची परवड होत आहे.
तालुक्यातील या भ्रष्ट कारभाराकडे कुणीच लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. जनतेच्या तक्रारी वाढल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रार केली तरी तेच याचे मूळ असल्याने कारवाई होत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता याविरोधात ठोस मोहीम राबवून तालुका भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
– आय. आर. घाडी, ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस
शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार सगळ्यांनाच ठाऊक आहे. असे असताना अधिकाऱ्यांचे कान पिळण्याऐवजी आमदार विठ्ठल हलगेकर याकडे का दुर्लक्ष करीत आहेत समजत नाही. त्यांनी जणू या कारभाराला मूक संमती दिली असल्याचे वातावरण आहे. त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आम्हालाच याविरोधात कठोर पाऊल उचलावे लागेल.
– महादेव कोळी, सदस्य केपिसीसी
दोड्डहोसूरनजीक अपघात : दुचाकी चालक ठार
कामासाठी गेला..हकनाक जीव गमावला..
समांतर क्रांती / खानापूर वैयक्तीक कामाच्या निमित्ताने बंगळूरला गेलेल्या चापगावच्या तरूणावर काळाने घाला घातला. बंगळूर येथील मॅजेस्टीक बस स्थानकाजवळ रात्री बसने चिरडल्याने भूषण भावकान्ना पाटील (वय ३०) हा जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ बहीण असा परिवार आहे. भूषण हा कामानिमित्त बंगळूरला गेला होता. तो मॅजेस्टीक बस स्थानक परिसरातील रस्त्याने चालत असतांना […]