
समांतर क्रांती / खानापूर
एका तहसिलदाराचे उत्पन्न किती असेल? हा सर्वसामान्यांना पडणारा गहन प्रश्न. खानापूरचे निलंबीत तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांचे नोकरीला लागल्यापासूनचे कायदेशीर उत्पन्न २ कोटी ९७ लाखांचे आहे. पण, त्यांच्याकडे लोकायुक्तांना तब्बल ५ कोटी ७० लाख ८२ हजारांची मालमत्ता आढळून आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबीत करण्यात आले असून त्यांना अटक टाळणे अवघड होणार आहे.
तहसिलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर ०८ जानेवारी रोजी लोकायुक्तांनी छापेमारी केली होती. त्यांच्या बेळगाव येथील बुडा योजनेतील घरासह खानापुरातील प्रशांत जांभळे यांच्या गायकवाड भाड्याने राहत असलेले घर, खानापुरातील तहसिल कार्यालय, निपाणी येथील नवनाथ चव्हाण यांचे घर, नवनाथ चव्हाण यांच्या पत्नी स्मिता चव्हाण यांच्या माहेरी व निपाणीतील वेद-गंगा मॅनेजमेंट प्रॉपर्टिजवर छापे मारले होते.
तेव्हा त्यांच्याकडे तब्बल ५ कोटी ७० लाख ८२ हजारांची मालमत्ता आढळली होती. त्यात खुल्या जागा, घरे, दागिणे आणि किमती वाहनांचा समावेश होता. मुदलात, गायकवाडांचे आतापर्यंतचे कायदेशीर उत्पन्न रु. २ कोटी ९७ लाख इतके होते. त्यातील त्यांनी १ कोटी ३६ लाख इतकी रक्कम खर्च केली आहे. तर १ कोटी ६१ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. तरीही त्यांच्याकडे ४ कोटी ९ लाख ८२ हजारांची अतिरिक्त मालमत्ता आढळून आली होती.
सुमारे १३७.९८ टक्के मालमत्ता वाढल्यामुळे त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांनी खानापूर तालुक्यात जांबोटीसह अन्य कांही ठिकाणी जमिनींची खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तुर्तास त्यांची बँक खातीदेखील गोठविण्यात आली आहेत.
रविंद्र हदीमणी यांच्याकडे पदभार

श्री. गायकवाड यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्याजागी कित्तूरचे तहसिलदार रविंद्र हादिमणी यांनी तात्काळ पदभार स्विकारला आहे. त्यांच्याकडे दोन्हीकडचा पदभार राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. खानापूर तालुक्यात एकाच वेळी नंदगड आणि सन्नहोसूर – भंडरगाळी येथील महालक्ष्मी यात्रा होणार असून याकाळात तालुक्यात पुर्णवेळ तहसिलदारांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भ्रष्टाचाऱ्यांची गय नाहीच..
खानापूर तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी काँग्रेसने बाह्या सरसावल्या असून कुणाचीही गय केली जाणार नाही. सरकार दरबारी पाठपुरावा करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना तालुक्याबाहेर हाकलण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

मोबाईल-टिव्हीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा: सौ. सुषमा शेलार
समांतर क्रांती / खानापूर पूर्वी महिला चूल आणि मूल एवढ्यापुरत्याच मर्यादीत होत्या. आज विविध क्षेत्रात मजल मारली आहे. पण, हे होत असतांना आधुनिकीकरणात गुरफटलेली महिला मोबाईल, टिव्हीसारख्या यंत्रणांच्या गुलाम बनत चालल्या आहेत, ही पुन्हा महिलांना गुलामगिरीकडे घेऊन जाणारे षड्यंत्र आहे. ते वेळीच ओळखून मोबाईल, टीव्हीतूनही आपणे आपल्या संसारासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी चांगले कांही देऊ शकतो. त्यासाठी […]