हल्ल्याळ : येथून जवळच असणाऱ्या जोगनकोप्प येथे फुगा फुगविणे विध्यार्थ्याच्या जीवावर बेतले. सातवीत शिकणाऱ्या नवीन बेळगावकर या विध्यार्थ्याचा या घटनेत हाकनाक बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, नवीन हा काल रविवारी त्याच्या घरी फुगा फुगवत होता. यावेळी हवेने भरलेला फुगा त्याच्या घशात अडकला. तो अस्वस्थ झाल्याने कुटुंबियांनी तात्काळ फुगा घशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण नविनचा श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला. त्याला हल्ल्याळ येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यावेळी तो डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने जोगनकोप्प गावावर शोककळा पसरली आहे. सातवीत शिकणाऱ्या विध्यार्थ्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
'फेंगल'चा परिणाम खानापूर तालुक्यावरही..
खानापूर : बंगालच्या उपसागरात स्थिरवलेल्या फेंगल चक्रीवादळाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्याना बसला आहे. ऐन हिवाळ्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने खानापूर तालुक्यातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. चक्क दिवाळीपर्यंत पावसाने तालुक्याला झोडपून काढल्यानंतर आता कुठे भात कापणी आणि मळण्याना जोर आला होता. त्यात आता भेंगल वादळमुळे रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी तालुक्याच्या काही भागात तूरळक सरी […]