समांतर क्रांती / खानापूर
खानापूरच्या भूमापन सहायक संचालकपदी सुप्रिया मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बेळगाव भूमापन विभागात अधिक्षक असून त्यांच्याकडे खानापूरचा अतिरिक्त कार्यभार असेल. येथील भूमापन सहायक संचालक ए.सी.किरणकुमार यांच्या निलंबनानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
हुळंद येथील जमिनीच्या दाखल्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सहायक संचालक किरणकुमार यांच्यासह अन्य दोघांना निलंबीत करण्यात आले होते. पण, त्यांनी न्यायालयात धाव घेऊन प्रशासकीय निर्णयाला अव्हान दिले होते. त्यात त्यांची पुनर्नियुक्ती झाली होती. पण, त्यांनी ३२ दिवसांची दीर्घ मुदतीची रजा घेतल्याने त्यांच्या रिक्त जागी श्रीमती सुप्रिया मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या त्रांत्रिक सहायकांनी ही नियुक्ती केली असून किरणकुमार यांच्या रजा काळात श्रीमती सुप्रिया मुंबई या येथील भूमापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.
भीषण अपघात: ट्रक पलटी होऊन १४ जण जागीच ठार
समांतर क्रांती / कारवार कारवार जिल्ह्यातल्या यल्लापूर तालुक्यातील अरेबैल घाटात आज पहाटे फळे – भाजीपाल्या वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांना आणि जखमीना यल्लापूर येथील सरकारी आरोग्य केंद्रात सध्या दाखल करण्यात आले आहे. हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथून ४० व्यापारी भाजीपाला […]