समांतर क्रांती / खानापूर
तहसिलच्या अखत्यारीत येणाऱ्या भूमापन विभागातील उपसंचालकांसह अन्य दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात आज गुरूवारी (०९) बाबत आदेश बजावण्यात आला आहे. कालच बुधवारी येथील तहसिलदारांवर लोकायुक्तांनी धाड टाकली होती, त्यानंतर झालेल्या या कारवाईने तालुक्यात खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे तालुक्यातील हुळंद येथील जमिनीतील फेरफार प्रकरण संबंधीतांना शेकले आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचीव आणि तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी हे प्रकरण सरकारदरबारी लावून धरले होते. त्यामुळेच ही कारवाई झाली आहे.
येथील सर्व्हे विभागातील कार्यालयात अंधाधुंद कारभार सुरू होता. त्याबाबत अनेक तक्रारी नागरीकांकडून केल्या जात होत्या. पण, स्थानिक लोकप्रतिनिधींनी नेहमीसारखेच याकडे दुर्लक्ष चालविले होते. हुळंद येथील सुमारे ५०० जमिनीच्या प्रकरणात तहसिलदारांसह सर्व्हे विभागाचे प्रभारी उपसंचालक ए.सी. किरणकुमार, प्रभारी भूमापक निरिक्षक आर.सी.पत्तार आणि भूमापक एम.आय.मुतगी यांनी गोलमाल केले होते. त्याबद्दल गावकऱ्यांनी डॉ. अंजली निबांळकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यानुसार डॉ. निंबाळकर यांनी सरकारदरबारी त्याचा पाठपुरावा करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधीतांना आज निलंबीत करण्यात आले आहे.
सर्व्हे विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू होते. त्यामुळे गोरगरिबांची परवड चालली होती. गेल्या दोन दिवसांतील दुसऱ्या मोठ्या कारवाईने महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.
अन्यायाविरुध्द लढा कायम : डॉ. निंबाळकर
खानापूर तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही मोहीम उघडली असून तालुक्यातील जनतेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचे मत डॉ. अंजली निंबाळकर यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना व्यक्त केले. जनतेला त्रास दिल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. त्यासाठी लढा उभारून आंदोलन करण्याची तयारी आम्ही केली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांना सुट्टी नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जळगेतील टस्कर शिमोग्याला.. प्रशिक्षित हत्तींचा वापर
समांतर क्रांती / खानापूर जळगे येथे गेल्या दोन महिन्यांपासून हैदोस मांडलेल्या टस्कराला जेरबंद करून शिमोग्याला हलविण्यात वनखात्याला यश आले आहे. त्यासाठी शिमोगा येथील चार प्रशिक्षीत हत्तींचा वापर करण्यात आला. या मोहीमेत शिमोगा येथील ३० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून टस्कराने जळगा गावाच्या भोवताली असलेल्या पिकांमध्ये धुडगूस चालविला होता. त्याला जंगलात हुसकावून लावण्याची मागणी […]