समांतर क्रांती / नंदगड
Suspicious death of leopard in Hirenagroli. तालुक्यातील हिरेअंग्रोळीनजिक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे कलेवर गावाजवळील शिवारात आढळले असून त्याची शिकार तर झाली नाही ना? याबाबत वनखात्याकडून तपास केला जात आहे. प्रथमदर्शनी वार्धक्य किंवा आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
काल रविवारी (ता.५) सकाळी बिबट्याचे कलेवर शेतकऱ्यांना दिसले. त्यांनी तात्काळ गोल्लीहळ्ळी वनविभागाला याची माहिती दिली. वनक्षेत्रपाल संतोष सुंबळी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नागरगाळी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक शिवानंद मगदूम हेदेखील ताततडीने घटनास्थळी दाखल झाले.बिबट्याची नखे, दात आणि त्वचा काढली गेली नसल्याने हा शिकारीचा प्रकार नसावा, असे श्री. मगदूम यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना सांगितले.
मृत बिबट्या मागील भाग कुजण्याच्या मार्गावर असल्याने त्याचा मृत्यू आठवडाभरापूर्वी झाला असल्याचा अंदाज आहे. आज सोमवारी (ता.६) उत्तरीय तपासणी त्याचे अवयव वन्यजीव वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. या प्रकारामुळे वनखात्यात खळबळ उडाली असून अधिक तपास केला जात आहे.
सीमाप्रश्नाला वैश्विक पातळीवरील विचारांची जोड हवी: डॉ. बाविस्कर
येळ्ळूरात २० वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात येळ्ळूर: मातृभाषेला पर्याय नाही. त्यासाठी ती टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. भाषेच्या प्रश्नासाठी लढत असतांना केवळ भावनेला महत्व देऊन चालणार नाही. मातृभाषा जगविण्याबरोबरच कृतीतून तिचे संवर्धन झाले पाहिजे. सीमाप्रश्नाला एका विशिष्ठ साच्यात बांधून न ठेवता, या प्रश्नाला वैश्विक विचारांची जोड द्यायला ही, असे प्रतिपादन डॉ. शरद बाविस्कर यांनी केले. […]