अखेर एकी झाली..‘मध्यवर्ती’ची मध्यस्थी यशस्वी
खानापूर: दोन गटात विभागलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी साधण्यात मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांना अखेर यश आले आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि आगामी विधानसभा निवणुकीत मराठी भाषिकांची लोकेच्छा प्रदर्शित करण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या केलेल्या आव्हानाला तालुक्यातील मराठी भाषिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येथील शिवस्मारकात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आठ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. एकंदर,एकीची प्रक्रिया विनासायास सुरू […]