खानापुरात प्रशासनाची दादागिरी; समितीचा फलक पुन्हा काढला
खानापूर: येथील म.ए. समिती कार्यालयासमोरील नामफलक आज पुन्हा हटविण्यात आला. मराठी मते केवळ समितीलाच मिळणार असल्याने हा अट्टाहास चालला असल्याचे आता स्पष्ट झाले असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.बेळगाव-पणजी महामार्गावर गणपती मंदिरच्या बाजूला समितीचे संपर्क कार्यालय आहे. पहिल्यांदा नगर पंचायतीची परवानगी नसल्याचे कारण दाखवून फलक काढण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला नाही. रितसर परवानगी […]