समांतर क्रांती वृत्त
खानापूर: अतिवृष्टी झाली तर ओला दुष्काळ, पाऊस नाही झाला तर सुका दुष्काळ शेतकऱ्याच्या वाट्याला येतो. सरकार चुकले तरी शेतकरीच भरडला जातो. लोंढाजवळ महामार्गावरील नव्याने बांधलेला पूल कोसळला. अतिवृष्टीमुळे पूल कोसळला हे सरकारी उत्तर असले तरी या घटनेमुळे मोहिशेतच्या शेतकऱ्यांची मात्र उपासमार होणार हे ठरलेले आहे.
लोंढाजवळचा जो पूल कोसळला आहे, तो मुळातच चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेला होता. पुलाखालून किती पाणी जाईल, याचा अंदाज नसल्याने पुलासाठी लहान जलवाहिन्या वापरण्यात आल्या होत्या. त्या दाबल्या जाऊन पूल कोसळला. आता पाण्याचा निचरा पूर्णपणे थांबला असून सुमारे सहा एकर शिवारात पाणी साचले आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली असल्याने पिक कुजून शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. कारण, शिवारातील पाण्याचा निचरा दुसऱ्या कोणत्याच ठिकाणाहून करण्यासारखी स्थिती नाही. पावसाळा संपून पूल बांधून पाण्याचा निचरा होईपर्यंत शिवाराला तलावसदृश्य स्वरूप असेल, असे पिडीत शेतकरी धनाजी मिराशी यांनी ‘समांतर क्रांती’ला सांगितले.
धनाजी आणि दत्तू मिराशी (मोहिशेत) यांची ही एकमेव जमीन आहे, ज्यावर त्यांचा वर्षभर उदरनिर्वाह चालतो. यंदा त्यांनी भात पेरणी केली होती. पीक चांगले तरारून आले असतांनाच ही घटना घडली. त्यामुळे यंदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. तहशिलदारांनी याची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भरपाई देऊ, ‘टोल’ला विरोध नको; वसुलीला सुरूवातही झाली!
समांतर क्रांती वृत्त खानापूर: महामार्ग आणि टोल प्लाझासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणाचा तातडीने निकाल लावू असे अश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी येथील बैठकीत दिले. पण, टोल वसुलीला विरोध करू नका असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे आज सोमवारपासून गणेबैल टोल नाक्यावर टोलवसुलीला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी तातडीने शेतकऱ्यांची आणि स्थानिक नेत्यांची बैठक येथील […]