समांतर क्रांती / बेळगाव
बिम्स रूग्णालयात नवजात बाळाला सोडून पळालेल्या महिलेविरोधात एपीएमसी पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेतील नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बैलहोंगल शहरातील बाबीजान सद्दाम हुसेन सय्यद असे त्या महिलेचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बबीजानला ८ डिसेंबर रोजी BIMS मध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच दिवशी तिने एका मुलीला जन्म दिला.मात्र, प्रसूतीनंतर ती हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना न सांगता नवजात बाळाला सोडून हॉस्पिटलमधून निघून गेली. त्यामुळे बाळ आजारी पडले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बाबीजान ही बाळाला रुग्णालयात सोडून का पळाली याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. यासंदर्भात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
‘लैला’च्या गाळप हंगामाला सुरूवात; गाळप क्षमता वाढविली
समांतर क्रांती / खानापूर येथील महालक्ष्मी ग्रूपच्या लैला शुगर्सच्या गाळप हंगामाला नुकताच सुरूवात झाली आहे. यंदा गाळपाला महिनाभर उशिर झाल्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात होती. तसेच विरोधकांकडून आरोप केले जात असतांना गाळपाला सुरूवात झाली आहे. लैलाचे चेअरमन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गव्हाणीत ऊस टाकून गाळपाचा शुभारभ केला. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. […]