समांतर क्रांती वृत्त
खानापूर: सुशिक्षितांचं गाव, चळवळीतील गाव, शेतकऱ्याचे गाव अशी कुप्पटगिरीची ओळख. मात्र ही ओळख आता लयास जाते आहे की, काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. गावात ढिगभर नेते आणि त्याहून अधिक समस्या. कुणाचा कुणाला पायपोस नसल्यामुळे गावातील समस्या सोडवायच्या कुणी हाच मुळात महत्वाचा प्रश्न बनला आहे. कुप्पटगिरी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दूरवस्था पाहिली की तेथील सामाजिक स्थितीची जाणीव झाल्याखेरीज राहत नाही. सर्वसामान्य नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या नावाने बोंबा मारत असले तरी खानापूर शहरात नाक्यानाक्यावर बसून नेतेगिरीच्या टापा मारणाऱ्यांने याचे कसेच कांही वाटत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माजी आमदार अशोक पाटलांच्या कृपेने कुप्पटगिरी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झाले. त्यासाठी दिवंगत निवृत्त मुख्याध्यापक संभाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यानंतर माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी या रस्त्याची एकदा डागडूजी करून घेतली होती. तद्पश्चात अद्याप या रस्त्याच्या डागडूजीकडे किंवा पुनर्डांबरीकरणाकडे कुणाही नेत्याचे लक्ष गेलेले नाही. सध्या या रस्त्याची आवस्था भीषण म्हणावी अशीच आहे. रस्त्यावर खड्डे की, खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर डांबरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य प्रस्तापीत झाल्याने आणखीनच समस्या निर्माण झाली आहे. चिखलात वाहने घसरून पडण्याच्या घटना घडत असतांनाही स्थानिक नेत्यांना साधे निवेदन देऊन आमदार आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधावेसे वाटत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
कुप्पटगिरी गावाने यावेळी विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकरांना भरभरून आशिर्वाद दिले. त्याशिवाय ‘भाग्यलक्ष्मी’ आणि आताची लैला शुगर्सच्या माध्यमातून त्यांचे या गावाशी ‘वेगळे’च संबध आहेत. त्यांच्याकडे गावातील नेत्यांनी साधे आर्जव केले असते तरी प्रवाशांचा प्रवास सूकर झाला असता, असे मत सामान्य नागरीक व्यक्त करीत आहेत. किमान जनाची नसली तरी मनाची तरी बाळगून गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करण्यात वाकब्गार असणाऱ्या गावातील नेत्यांनी रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
‘या’ देवाला लागतो, तंबाखू-सुपारी आणि दारूचा नैवेद्य..
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा कुतुहल जागविणारा आणि निसर्गाने ओंजळभरून विष्कार केलेला परिसर आहे. अनेक गमती-जमती आणि अफलातून अशा रहस्यकथा या भागात अनुभवायास मिळतात. देवाला तंबाखू, सुपारी, दारू चालत नाही, अशी समातन धारणा हिंदू संस्कृतीत आहे. पण, तालक्याच्या पश्चिम भागात जंगलवाटेवर एका देवाला मात्र पान,सुपारी, तंबाखू आणि दारूचा नैवेद्य […]