बेळगाव: आरोग्य क्षेत्रात पारिचारीकांची प्रमुख भूमिका असते. त्यांचे कार्य मोलाचे असते. त्यामुळेच या क्षेत्रातील कामकाज सोयीचे होते, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. त्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये आंतराष्ट्रीय नर्स (पारिचारीका) दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर मिनाक्षीताई रावसाहेब पाटील, डॉ. महादेव दिक्षीत आणि डॉ. माधुरी दिक्षीत उपस्थित होत्या. प्रसंगी आंतरराष्ट्रीय नर्स दिनानिमित्त आयोजीत विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डॉ. सोनाली सरनोबत आणि मिनाक्षीताई पाटील यांच्याहस्ते पारितोषीकांचे वितरण करण्यात आले.
पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पांढरी नदीत बुडून मृत्यू
रामनगर: पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा रामनगर (ता.जोयडा) पांढरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी घडली. मुबारक मेहबूब पठाण (वय ११, रा.हुबळी) व अफान अफताब खान (वय १२, चर्च गल्ली-रामनगर) अशी मयत बालकांची नावे आहेत. ते अन्य तिघा मित्रांसमवेत पोहायला नांद्रेकर पुलाजवळ गेले होते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, दिवसभर उष्णतेने अंगाची […]