समांतर क्रांती वृत्त
खानापूर: तालुक्यातील चांगला रस्ता दाखवा बक्षिस मिळवा, अशी योजना तालुक्यातील लोकप्रतिनिधींसाठी आयोजित करण्याची गरज आहे. त्यासाठी विजेत्यांना हमखास ‘गावरान’ पारितोषिके देण्याची योजना प्रत्येक गावातून व्हायला हवी. असे प्रवाशांना वाटू लागले आहे. कारण, तालुक्यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्याविना नाही. बैलूरच्या रस्त्याची आवस्था तर शासनाने रस्त्यावरच तलाव योजना राबविली आहे की काय? असा प्रश्न पडावा अशी आहे.
बैलूर गावाला जाणाऱ्या सहा कि.मी. रस्त्याची अत्यंत दयनीय आवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावातील अनेक तरूण दररोज या मार्गाने उद्यमबाग आणि परिसरातील कारखान्यांमध्ये कामाला जातात. त्यांना रात्री अपरात्री परतावे लागते. सध्या पावसाने खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे त्यातून वाट काढत घरापर्यंत पोहचतांना अक्षरश: जीव मुठीत ठेवावा लागतो. गेल्या सहा वर्षांपासून रस्त्याची ही अशी दूरवस्था असून आतापर्यंतच्या एकाही आमदार, जि.पं.सदस्याचे त्याकडे लक्ष गेलेले नाही. रस्त्याच्या दूरवस्थेने तालुक्याच्या प्रशासकीय ‘तत्परते’ची लक्तरे जणू वेशीवर टांगली आहेत. तरी त्यांची कुणालाच तमा नाही. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे.
बैलूर हे जांबोटी भागातील राजकीयदृष्ट्या पुढारलेले गाव म्हणून परिचीत आहे. पण, एकमेकांचे पाय खेचण्यापूरताच राजकारण केले जात असल्याचे रस्त्याच्या आवस्थेकडे दिसून येते. किमान पावसाळ्यानंतर तरी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
अवजड वाहनांमुळे रस्त्याची ही स्थिती झाली आहे. अवैध प्रकारे चालणाऱ्या या वाहतुकीला पंचायतीने आक्षेप घ्यायला हवा. पण, तसे झालेले नाही. त्याबाबत पंचायतीने खुलासा करावा. बससेवा बंद झाल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय कोण करणार? हे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ कार्यवाही व्हावी.
- दामोदर नाकाडी, अध्यक्ष कृषी पत्तीन बैलूर
..म्हणे अंगणवाडीसाठी कन्नड आवश्यक! मराठी अन्यायाविरोधात २७ रोजी बैठक
खानापूर : तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या 49 आणि मदतनिसांच्या 84 जागा भरण्यात येणार आहेत. पण या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना दहावीत कन्नड हा प्रथम अथवा द्वितीय विषय असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठी भागातील मराठी भाषिक महिला उमेदवारांवर अन्याय होणार आहे. याबाबत विचारविनिमय करून कायदेशीर दाद […]