समांतर क्रांती वृत्त
जांबोटी: मान येथील शिबोळी धबधब्याच्या डोहात बुडालेला युवक हुंचेनहट्टी (ता.बेळगाव) येथील असून आयान रियाजखान पठाण (वय 20) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांना सांगितले. तो धबधबा बघण्यासाठी त्याच्या मित्रांसमवेत गेला होता. पोहण्यासाठी दोघेजण डोहात उतरले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते बुडाले. त्यांच्यापैकी एकाला पर्यटकांनी बाहेर काढले .मंजुनाथ लमाणी (वय २०, रा.पिरनवाडी) हा या घटनेत सुदैवाने बचावला. पण, रिहान याला वाचविण्यात अपयश आले. सकाळी ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.The youth who drowned in Mann Shimboli falls is from Hunchenhatti.
डोहात पाण्याची पातळी वाढलेली असल्याने सायंकाळी अथक परिश्रमानंतर रिहानचा मृतदेह हाती लागला. गेल्या दोन आठवड्यांपासून शिबोळी धबधबा बघण्यासाठी पर्यटक प्रचंड गर्दी करू लागले आहेत. सदर धबधबा धोकादायक असल्याने पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून वारंवार केली जात असतांनाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष चालविले होते. ही घटना घडल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी ‘समांतर क्रांती’ मान येथील पर्यटकांच्या हुल्लडबाजीवर आवाज उठवित संभाव्य धोका अधोरेखीत केला होता. वाचा सविस्तर..
One thought on “मानच्या शिंबोळी धबधब्यात बुडालेला युवक हुंचेनहट्टीचा..”