समांतर क्रांती / खानापूर
बेळगाव येथे काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती निमित्त २६ आणि २७ डिसेंबर रोजी आयोजीत कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार तालुका काँग्रेसच्यावतीने जाहीर करण्यात आला. आज येथील शिवस्मारकात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूरचे प्रभारी व काँग्रेस नेते पारिश जैन होते.
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत खानापूर ब्लॉक कॉंग्रेसच्या अध्यक्ष महंतेश राऊत यांनी केले. यावेळी तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे (ग्रामीण) अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी, १९२४ मध्ये बेळगाव येथे काँग्रेसचे पहिले अधिवेशन महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली भरले होते. त्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत हा बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवणारा क्षण आहे. या शतकपूर्ती अधिवेशनाची आठवण म्हणून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने येत्या २६ व २७ रोजी बेळगाव येथे भव्य अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनला राष्ट्रीय नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने अधिवेशनाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना प्रभारी पारिश जैन आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगून या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. प्रसंगी केपीसीसी सदस्य महादेव कोळी, चंबाना होसमनी, जॉकी फर्नांडिस, गौसलाल पटेल, कशिम हट्टीहोळ्ळी, महीला अध्यक्ष दीपा पाटील, सावित्री मादार, वैष्णवी पाटील, अनिता दंडगल, निरुपादी कांबळे, प्रकाश मादार, लियाकतअली बिचन्नावर, राजेंद्र कब्बूर, अभिषेक होसमनी यासह अनेक जण उपस्थित होते.
मळणी सुरू असतांनाच हत्ती खळ्यावर..
समांतर क्रांती / खानापूर शिवारात पुन्हा टस्कर दाखल झाल्याने एका शेतकऱ्यांने नुकसान टाळण्यासाठी सकाळीच भाताची मळणी घातली होती. मळणी जवळपास पूर्ण व्हायला आली असल्याने शेतकरी आणि मळणीसाठी गेलेले कुटुंबीय निर्धास्त झाले होते. इतक्यात टस्कर अचानक मळणीच्या खळ्यावर दाखल झाल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. ही घटना जळगे येथील शिवारात घडली. महिनाभरापूर्वी या परिसरातून हा टस्कर पूर्व भागात […]