Three womens from Belgaum arrested in Kolva, Goa कोळवा: पर्यटक आणि पोलिसांशी हुज्जत घालत अर्वाच्य शिवीगाळ केल्याप्रकरणी बेळगावच्या तीन महिलांना कोळवा पोलिसांनी काल गुरूवारी (ता.०२) अटक केली आहे. जान्हवी साबळे, मधू पाटील आणि निलम पाटील अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांना कोळवा बिचवरून पोलिस स्थानकात आणल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामकाजात आढथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही महिला बेळगावच्या असून सध्या त्या गोव्यातील रावणफोंड येथे राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चर्चेतली ‘पार्टी’: ७ मंत्री, ३५ आमदार जारकीहोळ्ळींच्या घरी
7 ministers, 35 MLAs at Jarkiholli’s house बंगळूर: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मंत्रीमंडळात खांदेपालट करण्याचे संकेत दिले आहेत. आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची चर्चा रंगात आहेत. अशातच गुरूवारी (ता.२) रात्री बंगळूर येथील मंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांच्या घरी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यासह सात मंत्री आणि ३५ आमदारांनी ‘पार्टी’ केली. प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार परदेश दौऱ्यावर असतांनाच हे घडल्याने चर्चांना ऊत […]