खानापूर: सावरगाळी परिसरात दोन वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंदगड जंगल भागात वाघांच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. म.ए.समिती नेते नारायण कापोलकर हे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेतकाम करीत असताना दोन वाघ आनंदगडावर जाताना त्यांच्या दृष्टीस पडले. सध्या वाघांच्या मिलनाचा हंगाम असल्याने या दोन वाघांनी परिसरात मुक्त संचार चालविला आहे. मान्सून कधीही थडकेल त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. त्यात वाघांच्या मुक्त संचारामुळे भीतीचे वातावरण असल्याचे श्री कापोलकर यांनी सांगितले.
खानापुरात हे काय घडतंय? सगळंच बिघडतंय!
स्पॉटलाईट / चेतन लक्केबैलकर आई-वडिलांचा विरोध डावलून आधी पळून जाऊन प्रेमविवाह केला. दोन मुलं झाली. पण, कांही वर्षातच पुन्हा दुसरे सावज जाळ्यात सापडताच पोटच्या गोळ्यांना पतीच्या हवाली करून पत्नीने प्रियकरासोबत धूम ठोकली. अगदी चित्रपटाच्या पटकथेला साजेल अशी घटना खानापूरपासून जवळच असणाऱ्या एका खेड्यात घडू शकते, यावर नक्कीच कुणाचा विश्वास बसणार नाही. पण, हे घडलंय. तेही […]