खानापूर: करसवाडा- म्हापसा गोवा येथे नुकताच झालेल्या मरेथॉनमध्ये ३ किलोमीटर खुला गटातून ५० वर्षावरील गटामध्ये तोपिनकट्टी गावचे सुपुत्र श्री कल्लाप्पा मल्लाप्पा तिरवीर यांनी सुवर्णपदक मिळविले
श्री तिरवीर हे व्यवसाय निमित्त कोल्हापूर येथे स्थायिक आहेत. कोल्हापूर या ठिकाणी सतत प्रयत्न करून ज्योती क्लब बेळगाव यांच्या सानिध्यात गर्लगुंजी गावचे क्लबचे संस्थापक वरिष्ठ कोच एल जी कोलेकर व एल डी पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्र या ठिकाणी त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांनी आजवर ५० पेक्षा अधिक सुवर्णपदके मिळविली आहेत.
चोर्ला महामहामार्गावर चक्काजाम
जांबोटी: चोर्ला महामार्ग दुरुस्तीला विलंब होत असल्याने आज कणकुंबी येथे रास्ता रोको करून चक्काजाम करण्यात आला. परिणामी, तब्बल तीन तास या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार गायकवाड यांनी रस्ता दगडुजीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अरविंद पाटील यांनी केले. त्यांनी रस्त्याची दुरुस्ती न केल्यास पुन्हा आंदोलन करू असा […]