- १८ कि.मी.परिसरातील वाहणांना ३३० रूपयांचा मासिक पास
- सध्याचे दर ३१ मार्चपर्यंत असतील, त्यानंतर वाढ शक्य
- २४ तासातील परतीच्या प्रवासावर २५ टक्के सवलत
खानापूर: बेळगाव-खानापूर महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असतांनाच गणेबैल येथील टोल नाक्यावर मंगळवारपासून (ता.११) टोलवसुलीला सुरूवात करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. १८ कि.मी. परिसरातील गावांतील वाहणांनाही टोल आकारला जाणार असून मासिक ३३० रुपयांचा पास दिला जाणार आहे. मात्र, ट्रक व इतर व्यावसायीक वाहणांना निर्धारित दराप्रमाणे टोल भरावाच लागणार आहे. ३३० रुपयांचा पास केवळ प्रवासी वाहणांसाठी असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
सदर मार्गाची लांबी ३० कि.मी. असली तरी त्यातील केवळ १६ कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झालेल्या रस्त्यासाठी ११५४ कोटींचा खर्च करण्यात आला असून त्याच्या वसुलीकरता काम पूर्ण झालेल्या रस्त्याच्या तुलनेने दर आकरले गेले आहेत. या खर्चाची भरणा झाल्यानंतर दरामध्ये ४० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
स्थानिक वाहणांना टोल आकारला जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, टोल माफ न करता १८ कि.मी. परिसरातील वाहणांसाठी मासिक ३३० रुपयांचा पास अदा केला जाणार आहे. इतर वाहणांना २४ तासातील परतीच्या प्रवासावर २५ टक्के तर महिणाभरात ५० वेळा टोल भरलेल्या वाहणांना ३३ टक्के सूट दिली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात नोंदणी असलेल्या कमर्सियल वाहणांना ५० सूट दिली जाणार आहे. परवाणगीपेक्षा अधिक वजन वाहतूक केल्यास टोल दराच्या दहापट वसुली केली जाणार आहे.
चापगाव येथे घरफोडी
समांतर क्रांती वृत्त खानापूर: चापगाव येथील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरी चोरी झाल्याची घटना रात्री घडली. रमेश पाटील यांचे घर यडोगा रोडला घर आहे. ते काल कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्याने घराचा समोरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आतील तिजोरी फोडून त्यातील दागिने व किमती वस्तू लंपास केल्या आहेत. पाळत ठेवून ही चोरी […]