
बेळगाव : राज्यात जिल्हा आणि तालुका पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या प्रलंबीत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी चालविली आहे. एप्रिल-मेमध्ये या निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त संग्रेशी यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे यावेळी या तालुका आणि जिल्हा पंचायतीसह स्वराज्य संस्थांचे मतदान इव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा पुरविण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. सगळीकडे इव्हीएमबद्दल शंका-कुशंकांचे वातावरण असतांना कर्नाटकातील या निर्णयाचे सर्वच स्तरावर स्वागत होत आहे.
निवडणूक आयोगाकडून जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. एप्रिल-मेमध्ये जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन मतदार याद्या. निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली जात आहे. अंतिम मतदार यादी, जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीची आरक्षण याची पूर्तता झाल्यानंतर तात्काळ तारीख जाहीर केली जाणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
एप्रिलपर्यंत जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हलशीवाडीत शनिवारी क्रिकेट स्पर्धा
खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्सच्यावतीने शनिवारी (ता.२५) हाफपीच सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट संघानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून हाफपीच क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला ७५०० रुपये […]