समांतर क्रांती / चोर्ला
चोर्ला घाटात आज शनिवारी (ता.११) दुपारी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. घाटात वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास प्रवाशांना वाहनातच ताटकळत बसावे लागले. दरम्यान, भीषण अपघात घडल्याची अफवा पसरल्यामुळे अनेकांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागला. प्रत्यक्षात मात्र मागील शनिवारी (ता.५) झालेला अपघातग्रस्त ट्रक दरीतून बाहेर काढतांना ही कोंडी झाली होती.
मागील शनिवारी रामू शेळके यांच्या मालकीच्या ट्रकचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटून ट्रक दरीत कोसळला होता. अपघातानंतर ट्रकला आग लागल्याने सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले होते. अग्नीशामक दलाने ही आग विझविली होती. पण, त्यावेळी ट्रक बाहेर काढला नव्हता. आज शनिवारी (ता.११) हा ट्रक क्रेनच्या साहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात आला. त्यामुळे तब्बल दोन तासाहून अधिक काळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
वाहतूक कोंडीमुळे शेकडो वाहने तांबून होती. यात प्रवासी वाहनांची संख्या अधिक होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या महिन्यातील हा दुसरा शनिवार असल्याने सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बेळगावहून प्रवासी गोव्याला निघाले होते. तसेच गोव्यातील नागरीक खरेदीसाठी बेळगावकडे येत होते. त्यांना बराच काळ ताटकळावे लागले.
खानापूर को-ऑप बँक: ते आरोप आणि दावे हे पराभवाच्या धास्तीमुळेच..
समांतर क्रांती / खानापूर आम्ही बँकेच्या विकासासाठी धडपडत आहोत. त्यासाठी आम्ही विविध योजना राबवित आहोत. सभासदांना आम्ही करीत असलेल्या कामांवर विश्वास आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. विरोधकांना पराभवाची धास्ती असल्यामुळेच ते खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून मतदारांची दिशाभूल करीत आहेत, असे मत विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना केला आहे. बँकेत सुसज्ज […]