समांतर क्रांती / खानापूर
२०२४ हे वर्ष सरत असतांना खानापूर परिसरातील रुमेवाडी क्रॉस येथे काजूच्या फॅक्टरीला तर मारूती नगरच्या शिवारात गवत गंजीना आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याच्या घटना बुधवारी (ता.३१) घडल्या.
रुमेवाडी क्रॉस येथील सुरेश शिवणगेकर यांच्या काजूच्या कारखान्याला बुधवारी उत्तररात्री अचानक आग लागली. यावेळी कारखान्यात सुमारे ३० टन तयार काजू होता, असे शिवणगेकरांचे म्हणणे आहे. डायर मशिनमध्ये (काजू सुकविण्याचे यंत्र) बिघाड झाल्याने ही आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर कारखान्याच्या शेजारीच राहणाऱ्या शिवणगेकरांनी तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण केले. अग्नीशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत काजू आणि यंत्रे जळून खाक झाली होती. यात शिवणगेकर यांचे सुमारे ९० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील मारूती नगरच्या शिवारात दुपारी एकच्या सुमारास अचानक गवत गंजींना आग लागल्याने दहा ट्रॉली गवत जळून खाक झाले. यात शेतकरी अशोक गणेश गुरव आणि नागेश शंकर गुरव यांना सुमारे ६० हजारांचा फटका बसला आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतरही दिवसभर आग आणि धूराचे रोळ परिसरात दिसत होते. जनावरांसाठी साठवून ठेवलेले गवत भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांसमोर सुक्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. दोन्ही घटनांतील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.
बेळगाव: एस.पीं.ना बढती, चेतन सिंग राठोड नवे आय.जी.पी.
राज्यातील ६२ आयपीएस अधिकाऱ्यांना बढतीची लॉटरी बंगळूर: सरत्या वर्षाच्या पुर्वसंध्येला राज्यातील आय.पी.एस. अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट राज्य सरकारने दिली आहे. ६२ आपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळाली असून त्यापैकी चार जणांची बदली करण्यात आली आहे. तर उर्वरित सर्व अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करून सध्या कार्यरत ठिकाणीच सेवा कायम करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत हे अधिकारी त्याच ठिकाणी सेवा बजावतील, […]