
समांतर क्रांती / खानापूर
येथील श्री विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्टच्या श्री विश्वकर्मा जन्मोत्सव विशेषांकाचे प्रकाशन नुकताच गोवा क्रॉस येथील श्री विश्वकर्मा मंदिरात उत्साहात पार पडले. श्री विश्वकर्मा महात्म्य, खानापूर तालुक्यातील कलाविष्कार आणि ट्रस्टच्या वाटचालीचा उहापोह या विशेषांकात करण्यात आला आहे.सदर विशेषांकाची निर्मिती आणि मुद्रण ‘समांतर क्रांती’ पब्लिकेशन्स्ने केली आहे.
ट्रस्टच्या कार्याची माहिती मिळावी, यासाठी सदर विशेषांक प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सुतार यांनी दिली. याप्रसंगी यल्लारी नारायण सुतार, प्रभाकर मारुती सुतार, परशराम नागप्पा सुतार, प्रमोद इरप्पा सुतार, वासुदेव शिवप्पा सुतार, दयानंद कृष्णाजी सुतार, कल्पना बाबू कम्मार, जोतिबा बाळाप्पा सुतार, प्रकाश परशराम सुतार, राजेंद्र बाबुराव सुतार, बाळू नाना सुतार, शिवानंद नारायण सुतार, बाबुराव मारुती सुतार, बाबू परशराम सुतार, देवेंद्र कल्लप्पा बडिगेर, संतोष धनपाल बडिगेर, हणमंत सुतार आदींसह विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होते.
रविवारपासून जन्मोत्सवाचा कार्यक्रम
रविवारी (ता.०९) संध्याकाळी ८ वाजल्यापासून हरि जागराने श्री विश्वकर्मा जन्मोत्सव कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. सोमवारी (ता. १०) सकाळी ६ ते ८ श्री विश्वकर्मा अभिषेक व महापूजा, सकाळी ८ ते ९ देवाला पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा केला जाईल. सकाळी ९ ते १० होमवहन, सकाळी १०.३० ते १२ सांप्रदायीक भजन, दुपारी १२ ते १ श्री विश्वकर्मा यांचेवर किर्तन व महाआरती, दुपारी १.३० ते ३ श्री विश्वकर्मा महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ५.३० पर्यंत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम होणार आहे. तरी समाज बांधवांसह तालुक्यातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंदिर ट्रस्ट केले आहे.
रामनगरजवळील अपघातात पती ठार, पत्नी गंभीर जखमी
समांतर क्रांती / रामनगर रामनगर – गोवा महामार्गांवरील अक्राळी क्रॉजवळ थांबलेल्या ट्रकला ऍक्टिव्हा दुचाकीने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री घडली. लोंढा पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. दोघेही तीनईघाट (ता. जोयडा ) येथील असून मृत पतीचे ऍंथोनी डीलिमा (35)व जखमी पत्नीचे जास्मिन डीलिमा (32) असे नाव आहे. गुरुवारी […]