‘समांतर क्रांती’च्या वृत्ताची खानापूर समितीकडून दखल
खानापूर: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात भाजपचा प्रचार करण्यासाठी खानापुरात आल्यास नाईलाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल, असा इशारा तालुका समितीने दिला आहे. यासंदर्भात मंत्री संभूराजे देसाईंना पत्र पाठविण्यात आले असल्याचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सांगितले.
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे खानापुरात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर ‘समांतर क्रांती’ने याबद्दल समितीची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेत तालुका समितीच्या कार्यकरिणीने तात्काळ बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदेनी प्रचारासाठी खानापुरात येऊ नये, असा ठराव पारीत केला आहे.
मंत्री संभूराजे देसाई यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात, उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात निरंजन सरदेसाई हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात उपस्थित राहून जर सभा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसे झाले तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात आपण आहात हे सिद्ध होईल. त्यासाठी आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी आपणाला विनंती करतो की आपण सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करू नये. जर आपण खानापुरात उपस्थित राहून प्रचार सभा घेतली तर नाईलाजास्तव आपणाला काळे झेंडे दाखवून आपला निषेध केला जाईल, दक्षता घ्यावी म्हणून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती विनंती करीत आहे, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे समितीच्या विनंतीला मान देऊन उद्या गुरूवारी (ता.०२) होणारी सभा रद्द करून मराठी भाषिकांना दिलासा देणार की, पक्षनिष्ठेसह त्यांनी महाराष्ट्रधर्मही सोडला आहे, हे स्पष्ट होणार आहे.
भाजपने ३० वर्षात खानापूर शहराला काय दिले?
३० वर्षांच्या निष्क्रीय राजकारणाला मुठमाती द्या: डॉ. निंबाळकर खानापूर: इतर शहरांच्या तुलनेत आपले शहर अजूनही अनेक सुविधांपासून वंचीत आहे. केंद्राकडून या शहराच्या विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण, गेल्या ३० वर्षात निष्क्रीय भाजप खासदारामुळे कोणतीच योजना येथे राबविली गेलेली नाही. मला कर्मभूमीच्या विकासासाठी मला संधी देऊन ३० वर्षांच्या निष्क्रीय राजकारणाला मुठमाती द्या, असे आवाहन काँग्रेसच्या उमेदवार […]