खानापूर: सध्या उष्म्याने नागरीक हैराण झाले असतांनाच राजकीय नेत्यांच्या तोंडाच्या वाफेने त्यात अधिकच भर घातली आहे. कोण विकास केल्याचे उर बडवून सांगत आहेत, तर कुणी विकासाचे गाजर दाखवून मतांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी हापापले आहेत. तब्बल अर्धा डझन नद्यांचे उगमस्थान असलेल्या खानापूर तालुक्यातील १४ गावातील जनता मात्र पाण्यासाठी चहूकडे भटकंती करीत आहे. Water shortage in 14 villages of Khanapur taluka
तालुक्याची जीवनदायिनी मलप्रभेसह सहा नद्यांचा उगम तालुक्याच्या पश्चिम घाटातून झालेला आहे. तीही दरवर्षी खानापूर तालुक्याला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. सध्या तालुक्यातील हलकर्णी, गांधीनगर, लक्केबैल, रामापूर, क.नंदगड, गर्बेनहट्टी, वडगाव, लोकोळी, कक्केरी, करीकट्टी आणि उचवडे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना शेतवडीत भटकंती करावी लागत आहे. शेतवडीतील बोअरवेल आणि टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे पाण्याची समस्या असलेली बहुतांश गावे ही नदीच्या काठावर आहेत. सध्या नदी कोरडी पडली आहे. नदीच्या काठावरील गावांमध्येच पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेले लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मात्र उर बडवून विकास केल्याचे सांगत फिरत आहेत.
कांही गावांनी पाण्याच्या समस्येवरून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे त्याची दखल घेत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी संबंधीत पिडीत गावांना पाणी पुरवठा करण्याची सूचना ग्राम पंचायतींना केली आहे. शुक्रवारी त्यांनी क.नंदगड गावाला भेट देऊन पाहणी केली. एकीकडे नेते मतांसाठी कोकलत असतांना दुसरीकडे मात्र मतदारांच्या घशालाच कोरड पडली असल्याचे चित्र दुर्दैवी आहे.
चर्चा वरवरच्या: १२ कोटींचा उमेदवार
आता हेच पहा ना, सर्वच उमेदवारांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी घोषीत करून आठवडा लोटला तरी उमेदवारी मिळविण्यासाठी केलेल्या करामतींच्या चर्चेची धूळ अद्यापही बसलेली नाही. खानापुरातील एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी तब्बल १२ कोटी मोजल्याची चर्चा आहे. हल्ली उमेदवारी मिळविणे ही तारेवरची कसरत झाली आहेच म्हणा! पण, म्हणून पक्षनेत्यांना तब्बल १२ कोटी चारल्याची ही […]