समांतर क्रांती विशेष
अर्धा डझन नद्या आणि डझनभर नाल्यांचा उगम असणाऱ्या खानापूर तालुक्यातील धबधबेही तेवढेच विलोभनीय आणि पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. खानापूर शहरापासून आवघ्या चार कि.मी. अंतरावर असणाऱ्या बाचोळी धबधब्यालाही आता पर्यटक हमखास भेटत देत आहेत. कुंभार नाल्यावर असणाऱ्या कर्नाटक जलसंधारण खात्याच्या तलावातून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. खानापूर येथे मलप्रभा नदीला मिळणाऱ्या कुंभार नाल्यावर हा धबधबा आहे. जिल्हाभरातून दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देत असले तरी खानापूर तालुक्यातील स्थानिक याबाबत अनभीज्ञ आहेत.
कसे जाल?
खानापूर बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जांबोटी क्रॉस या खानापूर-जांबोटी राज्यमार्गाने पुढे चार कि.मी. गेल्यानंतर हरसनवाडी गावाच्या फाट्याच्या आधी अर्धा कि.मी. अंतरावर पायी चालत जाता येईल इतक्या अंतरावर हा धबधबा आहे. राज्य मार्गावर यासंबंधीचा फलक लावलेला आढळतो. कौटुंबीक सहलीसाठी आणि विशेषत: वर्षा पर्यटनासाठी हे ठिकाण म्हणजे ‘मेजवानी’च आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन या ठिकाणी मौजमजा करा, म्हणजे पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येईल.
खानापूरच्या मान्सूनला विक्रमी पावसाची ‘सर’ नाही
समांतर क्रांती वृत्त खानापूर: जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात केवळ ७८.८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. जून दहाला मान्सून तालुक्यात पोहचला तरी पावसाच्या तुरळक शिडकावा सोडला तर महिनाभरात एकदाही मुसळधार कोसळलेली नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तरी दमदार पाऊस होईल अशी तालुकावासीयांची आशा होती. तीदेखील धुळीला मिळाली आहे. तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टरमध्ये भात पिक घेतले जाते. त्यातील […]