समांतर क्रांती / बेळगाव
जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या कार्यकारीणी बरखास्त होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला तरी निवडणूक घेतली न गेल्यामुळे विकास कामांना खिळ बसली आहे. आता तर कॅग (नियंत्रण आणि महालेखापाल) अहवालात सुध्दा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी फेब्रूवारी महिन्यात निवडणूक होईल, असे सुतोवाच्च केले आहे.
२०२१ मध्ये जिल्हा आणि तालुका पंचायत बरखास्त झाल्यानंतर राज्यातील जिल्हा आणि तालुका पंचायत मतदार संघांची पूनर्रचना जाहीर करण्यात आली होती. त्याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली. चार वर्षे उलली तरी निवडणूक घेण्याविषयी अद्याप सरकारकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. तालुका आणि जिल्हा पंचायतींवर कार्यकारीणी मंडळ नसल्यामुळे विकास कामांचा बोजवारा उडाला आहे. तसेच ग्राम पंचायतींच्या कारभारावर नियंत्रण न राहिल्याने गैरव्यवहार वाढले आहेत.
गेल्या चार वर्षांत जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निधीत सुध्दा कपात करण्यात आली आहे. १४ व्या वित्त आयोगातून ६०९ तर १५ व्या वित्त आयोगातून ३७० कोटींचा निधी कपात करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरील विकास कामांचा हक्क हिरावला गेला आहे, असा आरोप कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे. एकंदर, सरकारच्या दुर्लक्षामुळे थ्री-टायर प्रशासकीय यंत्रणेच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. सर्वसामान्य नागरीक सुध्दा आता जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका कधी होणार? असा प्रश्न विचारू लागले आहेत.
- निवडणूक फेब्रूवारीत?
- जिल्हा आणि तालुका पंचायतींची निवडणूक फेब्रूवारीत होतील, असे सुतोवाच्च उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी नुकतेच केले आहे. त्यासाठीची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने दिरंगाई झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खानापुरात ‘स्वखुशी’ने वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा
समांतर क्रांती / खानापूर आमंत्रण लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय उधळून लावलेल्या खानापूर पोलिसांनी ‘स्वखुशी’ने चाललेल्या ‘धंद्या’ला हातभार लावल्याची चर्चा आहे. शहरांतर्गत महामार्गावरील गामधीनगर येथील एका लॉजवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. त्याठिकाणी मुला-मुलींसह अनेक जोडपी आढळली. पण, त्यांनी आम्ही स्वखुशीने लॉजवर आल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई टाळली. खानापूर शहर आणि परिसरातील लॉज ही शरिर विक्रयाची ठिकाणे […]