समांतर क्रांती विशेष
कर्नाटकातील निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता शेतकऱ्याचे लक्ष शिवाराकडे वळले आहे. मान्सून कधी थडकणार याची याबाबत केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर हवामान तज्ञांनानाही कुतूहल आहे. सहस: मान्सूनचे केरळमध्ये १ जून रोजी आगमन होते? पण गेल्या १०० वर्षात १९१८ साली ११ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तर सर्वात उशिरा १८ जून १९७२ साली मान्सून केरळात दाखल झाला होता. यंदा वेळेत मान्सून केरळमधून प्रवेश करून पुढील ३८ ते ४० दिवसांत संपूर्ण देशात पसरेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
केरळला मान्सूनचे प्रवेशद्वार मानले जाते. मान्सूनच्या केरळ किनारपट्टीवरील (एम.ओ.के अर्थात ऑनसेट ऑफ मान्सून ओव्हर केरळ) विश्लेषणानुसार, केरळ किनारपट्टीवर १ जून रोजी मान्सूनचे आगमन होते. केरळमधील मान्सूनचे आगमन ही भारतीय उपखंडातील मान्सूनच्या सुरूवातीची एकमेव अशी कडी आहे. त्याचा प्रभाव मान्सूनच्या पुढील वाटचालीवर होतो. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमनही एमओकेच्या तारखेवरूनच ठरते.
मोखा चक्रीवादळ आणि समुद्रातील जलद हालचालींमुळे मान्सूनचे आगमन यंदा लांबणार असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या १०० वर्षात केवळ अनेकवेळा हा अंदाज खोटा ठरला असला तरी सामान्यत: १ जूनरोजी मान्सूनचे आगमन होतेच, असे मानले जाते.
आकडे बोलतात..
वर्ष केरळमध्ये आगमन वर्ष केरळमध्ये आगमन
२००१ २३ मे २०१२ ५ जून
२००२ २९ मे २०१३ १ जून
२००३ ८ जून २०१४ ६ जून
२००४ १८ मे २०१५ ५ जून
२००५ ५ जून २०१६ ८ जून
२००६ २६ मे २०१७ ३० मे
२००७ २८ मे २०१८ २९ मे
२००८ ३१ मे २०१९ १ जून
२००९ २३ मे २०२० १ जून
२०१० ३१ मे २०२१ ३ जून
२०११ २९ मे २०२२ २९ मे
2 thoughts on “कधी थडकणार मान्सून? काय सांगतो १०० वर्षांचा इतिहास?”