समांतर क्रांती वृत्त
खानापूर: अवघा २५ वर्षांचा तरुण गळफास घेऊन मृत्यूला कवटाळतो. त्याने जीवन का संपविले? हरसणवाडी येथील तरुण रोशन रायमन फर्नांडिस याने घरी कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपासून त्याला फिट्स येत होत्या. त्याच्यावर उपचारही सुरू होते, त्याचा इलाज होत नसल्याने तो निराश झाला होता. त्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. खानापूर पोलिसात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
बेळगावच्या तरुणाचा गोव्यात खून
समांतर क्रांती वृत्तपणजी: डिचोली संगम सेतुजवळ बेळगाव (कर्नाटक) येथील रमेश गवळी (वय ३५) याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.रमेश गवळी याचा मृतदेह सकाळी पुलाखाली आढळून आला. त्याच्या अंगावर सुरीने खुपसल्याचे व्रण आढळले आहेत. त्यामुळे हा खुनच असल्याचे स्पष्ट झाल्याने डिचोली पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. रमेश […]