संग्रहीत फोटो
खानापूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सायंकाळी भाजपच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमविण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजूर महिलांना बोलाविण्यात आले असून त्यांना दुपारनंतर ‘पगारी’ सुट्टी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसे झाल्यास संबंधीत ग्राम पंचायतींचे पीडीओ आणि रोजगार हमी योजना संयोजकांविरोधात तक्रार करणार आहोत, अशी माहिती ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी दिली.
रोजगार हमी योजनेतील मजूर महिलांना विविध आमिषे दाखवून त्यांना प्रचाराला बोलाविण्यात आले आहे. तशी माहिती मजूर महिलांनीच आम्हाला दिली. एकंदर, तालुक्यातील सत्तेचा गैरवापर केला जात असून अधिकाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. दुपारनंतर सभेला हजर व्हायलाच हवे, असा दमही मजूरांना भरण्यात आल्याचे समजते. तसे होत असेल तर त्याला आमचा विरोध असून याविरोधात तक्रार करून कारवाईची मागणी करणार आहोत, असे मत श्री.कोळी यांनी व्यक्त केले.
भाजपच्या नेत्यांना पराभवाची जाणीव झाली आहे. भाजपची आश्वासने खोटी आहेत, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे लोकदेखील नेत्यांना प्रतिसाद देईनासे झाले आहेत. त्यासाठीच अधिकाऱ्यांवर दबाव आणून नरेगा मजूरांना सभेला बोलावण्याची वेळ स्थानिक नेत्यांवर आल्याचा आरोप कोळी यांनी यावेळी केला आहे.
अपघातात शिवठाणचा तरूण ठार, अन्य एकजण जखमी
खानापूर: दुचाकीला ट्रकने मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात शिवठाण येथील तरूण ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना खानापूर-जांबोटी मार्गावर बाचोळी फाट्यानजीक दुपारी १२ च्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवठाण येथील तरून विधेश तुकाराम मिराशी (वय २५) व त्याचा मित्र दुचाकीवरून मित्राच्या लग्नाला जात होते. दरम्यान, […]