समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर
बेळगाव जिल्ह्यासह बेळगाव तालुक्याच्या विभजनाची घोषणा पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे जिल्हा विभजनाच्या वादात आता बेळगाव तालुक्याचे विबाजन हा नवा मुद्दा समोर आल्यामुळे चर्चेचा उधाण आले आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास खानापूर तालुक्यातील कांही गावांचाही समावेश नव्या तालुक्यात होण्याची शक्यता आहे.
१९८० साली पहिल्यांदा जे.एच.पटेलांनी जिल्हा विभाजनाची वात पेटवून दिली. त्यानंतर चिकोडी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, या मागणीला जोर आला. १९९७ नंतर ही मागणी अधिक जोर धरू लागली आणि बेळगाव जिल्ह्याचे तीन जिल्ह्यात विभाजन व्हावे, असा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार बेळगाव, चिकोडी आणि गोकाक जिल्हा व्हावा, अशी मागणी होत राहिली. त्याला स्वातंत्र्यदिनी ना. जारकीहोळी यांनी हूल दिली. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. बेळगाव हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे. तब्बल ४७ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या या जिल्ह्यात १८ विधानसभा, तीन लोकसभा मतदार संघ आहेत. १५ तालुके, ५०६ ग्राम पंचायती, ३४५ तालुका पंचायत सदस्य आनि १०१ जिल्हा पंचायत सदस्य आहेत. विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगावची ओळख असली तरी विकासाच्या दृष्टीकोनातून मागासलेला जिल्हा आहे. हा जिल्हा मराठी, कन्नड आणि हिंडी असा बहूभाषीक आहे.
विस्ताराने मोठा असल्याने बेळगाव जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. याबाबत वेळोवेळी चर्चा झाल्या. चिकोडी तर दरवर्षी याबाबत आंदोलने झाली आहेत. त्याचाच धागा पकडून ना. जारकीहोळी यांनी जिल्हा आणि तालुका विभाजनाचे सुतोवाच्च केले आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगतांना लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
कसे असतील नवे जिल्हे?
बेळगाव जिल्हा: बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी, हुक्केरी, खानापूर
गोकाक/ बैलहोंगल: बैलहोंगल, रामदूर्ग, कित्तूर, गोकाक, मुडलगी
चिकोडी: चिकोडी, अथणी, कागवाड, निपाणी, रायबाग, कुडची
बेळगावचे काय?
ना. जारकीहोळी यांनी बेळगाव तालुक्याच्या विभाजनाविषयीही निर्णय झाल्याचे म्हटले आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन पूर्व आणि पश्चिम असे होईल. पश्चिम बेळगावमध्ये खानापूर तालुक्यातील गावांचा समावेश शक्य आहे. तसे झाल्यास बैलूर परिसरातील अनेक गावे नव्या पश्चिम बेळगाव तालुक्यात असतील तर पूर्व तालुक्यात पारिश्वाड परिसरातील गावांचा समावेश असेल, असा अंदाज आहे. यामुळे राजकारण आणि विकासाची गोळाबेरीज बदलणार आहे. नव्या बदलांचा सीमाप्रश्नाच्या खटल्यावर परिणाम शक्य असल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
करपलं रान देवा.. खानापूर तालुक्यावर अस्मानी संकट
समांतर क्रांती वृत्त खानापूर: मान्सून लांबल्यामुळे हावलदिल झालेल्या बळीराजाला जुलै महिन्यातील पावसाने दिलासा दिला होता. तरीही भात लागवड लांबलीच, आता कुठे भात लागवडीची कामं हातावेगळी करीत असतांना पुन्हा पावसाने हुलकावणी दिली आहे. तालुक्यातील सुमारे ३२ हजार हेक्टरमध्ये यंदा भात पेरणीसह लागवड करण्यात आली आहे. पण, पावसाअभावी भात पिक करपून जाऊ लागल्याने शेतकरी हत:श झाला आहे. […]