खानापूरात गुरूवारी घडली होती घटना
समांतर क्रांती / खानापूर
Worker injured by falling iron rod dies येथील बहार गल्लीत घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असतांना डोकीत लोखंडी रॉड पडल्याने जखमी झालेल्या कामगाराचा आज शुक्रवारी (ता.०३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाना चापगावकर (वय ५४, रा. केंचापूर गल्ली-खानापूर) असे मयताचे नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, काल गुरुवारी (ता.२) येथील बहार गल्लीत नंदगडी यांच्या घराच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने लोखंडी रॉड हटविला जात असतांना तो नाना यांच्या डोकीवर कोसळला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना आज शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
तब्बल ३५ वर्षानंतर भरणार त्यांची शाळा..
समांतर क्रांती / खानापूर शाळा सुटल्यानंतर कुणी नोकरीत, कुणी व्यवसायात तर कुणी शेतीत गुंतलेले. संसाराच्या धबागड्यात भूतकाळ्याच्या आठवणी उराशी घेऊन जगणारे मित्र एकत्र येणार आहेत. त्यांची शाळा तब्बल ३५ वर्षांनंतर भरणार आहे. निमित्त आहे स्नेहमेळाव्याचे.. तालुक्यातील गुंजी येथील सरकारी शाळेतील १९८५-८६ आणि मराठा मंडळ संचलित गुंजी हायस्कूलचे १९८८-८९ च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी पुन्हा एकदा एकमेकांची […]