यल्लापूर : उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांनी दुचाकी घसरून पडल्याने जखमी झालेल्या तरूणाला स्वत:च्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. तसेच जखमीवर स्वत: उपचारदेखील करून माणुसकीचे दर्शन घडविले. Timely treatment saved the life of the injured youth.
हल्याळ येथील प्रचार आटोपून रात्री शिरसीला जात असताना यल्लापूर-शिर्सी महामार्गावर विनायक शेट्टर हा दुचाकी घसरून रस्त्याच्या कडेला पडला होता. जखमी होऊन त्याची शुध्द हरपली होती. रस्त्याच्या कडेला पडलेल्या व्यक्तीला पाहून डॉ.अंजली यांनी गाडी थांबवली, जखमी व्यक्तीची तपासणी केली आणि ताबडतोब स्वतःच्या गाडीतून शिरसी रुग्णालयात नेले. जखमींना शिरसी येथील पंडित शासकीय रुग्णालयात दाखल करणाऱ्या डॉ.अंजली यांनी स्वत: डॉक्टर म्हणून उपचारही केले.
दुचाकीस्वाराच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली, त्यांनी जखमीला धीर दिला व वैद्यकीय पथकासह त्यांनी माणुसकी दाखवून दुचाकीस्वाराचे प्राण वाचविण्यास मदत केली. प्रचाराच्या धामधुमीतही त्यांनी दाखविलेल्या सर्तकतेबद्दल नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
मणतुर्गेतील रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी उत्साहात
खानापूर: मणतुर्गे येथील रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास पाटील व सौ. भाग्यश्री विलास पाटील होते. प्रारंभी रवळनाथाचे पुजन गावचे पुजारी विष्णू गुंडू गुरव आणि सौ. लक्ष्मी विष्णू गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन ज्येष्ठ नागरिक नारायण गुंडपीकर, वासुदेव पाटील, विठोबा देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल अशोकराव […]